श्री विष्णु मंदिरासह श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे प्राचीन शिवाई मंदिर आणि प्राचीन शिवमंदिर विद्यमान आहेत. अलीकडच्या काळात चिंचवड देवस्थान ट्रस्टद्वारे या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आता ही दोन्ही प्रशस्त मंदिरे भक्तांच्या आनंदाचे अधिष्ठान ठरत आहेत.